१) अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला :
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाप्रसंगी एक विचार मांडला होता, “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !” थोडक्यात आपल्या लोकांनी महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता मुलुखगिरी करावी आणि तंजावर ते पेशावरपर्यंतच्या मुलुखात आपले वर्चस्व निर्माण करावे ही त्यातील प्रेरणा आणि दिशा होती. नंतरच्या काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावून महाराजांचा विचार सत्यात उतरवला. आज महाराज आले तर ते समाजाला कोणती प्रेरणा आणि दिशा देतील ? यावर प्रविणदादांनी चिंतन केले आणि एक विचार आपल्यासमोर मांडला, ”अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला !” म्हणजेच आपल्या लोकांनी भारतापुरते मर्यादित न राहता जगभरात मुलुखगिरी करावी आणि नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या उपलब्ध झालेल्या संधी हेरुन त्यातून आपले अर्थकारण मजबुत करावे. जगभर Community Farming करावे.
२) डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी :
आजच्या काळात अर्थाशिवाय कशालाच अर्थ नाही. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला जगात किंमत आहे. तुमचे किमान मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे पैसा असायलाच हवा. लोकशाहीमध्ये तुमची संख्या किती आहे यापेक्षा तुमचे अर्थकारण किती मजबूत आहे याला जास्त महत्त्व आले आहे. तुम्ही पैशांवर प्रेम केले तर लोक तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करतील. त्यासाठीच शाहू महाराज सांगतात त्याप्रमाणे प्रत्येकाने आर्थिक जगाचे सैनिक बना. डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी या वाक्यामागचा मतितार्थ असा की आपल्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि खिशामध्ये पैसा असायलाच हवा.
३) Seeing is Believing (सीईंग इज बिलीविंग) :
Seeing is Believing म्हणजे एखादी गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघणे हेच त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे माध्यम असते. त्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यानंतरच आपण पुढे त्याबाबत विचार करायला सुरुवात करतो. ही संकल्पना आजच्या तरुणांना वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज प्रविणदादांनी ओळखली आणि त्यांनी “दुबई आंतरराष्ट्रीय अभ्यासदौरा” सुरु केला. अत्यंत उष्ण वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईमध्ये आज स्वर्ग निर्माण झाला आहे. जगातील प्रतिष्ठित आणि प्रमुख कंपन्यांची कार्यालये आज दुबईमध्ये आहेत. हे सर्व बदल अलीकडच्या ६०-७० वर्षांच्या काळातील आहेत. तुम्ही जेव्हा हे सर्व तुमच्या डोळ्यांनी पाहाल, तेव्हा तुम्हाला उद्योग, व्यवसाय करण्याची नवी प्रेरणा मिळेल असा या दुबई अभ्यासदौऱ्यामागचा उद्देश आहे.
४) नवी दिशा नवा विचार :
संभाजी ब्रिगेडची ओळख ही प्रामुख्याने आक्रमक आंदोलने करणारी संघटना अशीच राहिली आहे. मराठा समाजाची शक्ती, वेळ, पैसा या गोष्टी गेली ३५-४० वर्षे केवळ आरक्षण या विषयाभोवती केंद्रित झाल्या आहेत. मात्र आजही मराठ्यांच्या हातात म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलट हजारो केसेस, अनेक आंदोलकांचा बळी, राजकारण्यांकडून फसवणूक, सामाजिक सलोख्याचे बिघडलेले वातावरण, इत्यादि नको असणाऱ्या गोष्टी पदरात पडल्या. केवळ आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, म्हणून आता उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात उतरायला हवे असे प्रविणदादांचे सांगणे आहे. आपल्या तरुणांना उद्योग व्यवसायाचे धडे देण्याची आवश्यकता असल्याचे ओळखून दादांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातुन Business Conference सुरु केल्या आहेत. आज या गोष्टीचे बीजारोपण झाले आहे, मात्र भविष्यात संभाजी ब्रिगेडची ही नवी दिशा आणि नवा विचार समाजात हजारो उद्योजक निर्माण करेल हा विश्वास आहे. आर्थिक सक्षमीकरणाची ही चळवळ आजच्या काळाची गरज आहे.
५) MARATHA शब्दाची व्याख्या :
मराठा म्हटलं की आजपर्यंत “मराठा मोडेन पण वाकणार नाही, मराठे म्हणजे खेकडा प्रवृत्तीचे लोक, वगैरे” आत्मघातकी वाक्य मराठा समाजाच्या मेंदूवर कोरण्यात आली. या अधू मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रविणदादांनी मराठा समाजाची नवी व्याख्या समाजासमोर मांडली. मराठा समाजाला आपल्यातील उर्जेची, क्षमतेची वास्तविक जाण व्हावी आणि त्यांना उद्योग, व्यवसायासाठी प्रेरणा मिळावी अशा पद्धतीने या नव्या व्याख्येची रचना केली आहे. ही व्याख्या पुढीलप्रमाणे :
MARATHA
M – Money (पैसा)
A – Aspiration (प्रेरणा)
R – Resource (साधने)
A – Ambitions (इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा)
T – Talent (ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य)
H – Humble (नम्र)
A – Achievement (यश)
तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे प्रेरणा असली पाहिजे. तुमच्याकडे कोणकोणती साधनं, स्त्रोत आहेत याची माहिती असली पाहिजे. तुमच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान असेल पाहिजे. या गोष्टी एकत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला यश हमखास मिळाल्याशिवाय राहणार नाही. मराठा शब्दाचा खरा अर्थ हा असल्याने, मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी असली पाहिजे.